पुणे – कोंढणपूर भागातील आर्वी गाव परिसरात पी.एम्.पी.एम्.एल्. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.) बसने १० जानेवारीला १४ गायींना धडक दिली. यात काही गायींचा मृत्यू झाला, तर काही गायी गंभीर घायाळ झाल्या. या घटनेची माहिती मिळताच, या पी.एम्.पी.एम्.एल्. बसच्या चालकाला पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने तात्काळ निलंबित केले आहे. चालकाचा जबाब घेण्यात आला असून वरिष्ठ अधिकार्यांकडून या घटनेविषयी चालकाची चौकशी चालू आहे. चौकशीअंती चालकावर आणखी कडक कारवाई होईल, असे पी.एम्.पी. प्रशासनाकडून सांगण्यात आले. गायींच्या मालकाला तातडीचे ५० सहस्र रुपयांचे साहाय्य ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’कडून देण्यात आले आहे.