बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी : देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका !

बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची महाराष्ट्रातील वाढती संख्या ही सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ राज्याच्याच नाही, तर देशाच्याही पुढील मोठे आव्हान ठरत आहे. एका अनुमानाप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या सुमारे १५ कोटी असून या घुसखोरांनी ईशान्य भारतासह, बंगाल, बिहार, तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात शिरकाव केल्यामुळे तेथील लोकसंख्येच्या प्रमाणावर मोठा प्रभाव पडलेला आहे. सध्या बांगलादेशात पसरलेल्या अराजकामुळे या घुसखोरीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही वृत्त आहे.

१. महाराष्ट्रात शहरी भागासह ग्रामीण भागात बांगलादेशी मुसलमानांची वाढती घुसखोरी

वर्ष १९७५ पासूनच बांगलादेशामधून भारतात घुसखोरी चालू असली, तरी खालिदा झिया यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली. गेल्या काही मासांत बांगलादेशातील अराजक आणि कट्टरपंथीय मुसलमान पक्ष अन् संघटना यांच्या वाढलेल्या प्रभावामुळे या संदर्भातील चिंता अधिकच वाढलेली आहे. महाराष्ट्रातील आधी काँग्रेस आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात बांगलादेशी मुसलमानांची राज्यातील घुसखोरी सातत्याने वाढत गेली. यामुळे मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या शहरात त्यांनी स्वतःची केंद्रेच बनवण्यात यश मिळवले आहे. त्याखेरीज बांगलादेशी कामगार शेती आणि पशूपालनाशी संबंधित कामासाठी अल्प मूल्यामध्ये सिद्ध होत असल्याने ग्रामीण भागातही त्यांनी शिरकाव करण्यास प्रारंभ केलेला आहे.

२. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे भारतातील शासकीय ओळखपत्रे

नुकतीच ऑक्टोबर मासात पुणे पोलिसांनी २१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. जुलै मासातही पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४२ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्याआधी सप्टेंबर मासात पालघर येथे ५, नवी मुंबई येथे ७, तर ऑगस्ट मासातही नवी मुंबईत ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. चिपळूण येथेही ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. या घुसखोरांकडे भारताचा पासपोर्ट (पारपत्र), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळाली, हे अधिकच चिंताजनक आहे. भारतात शिरकाव करून बस्तान बसवलेल्या अनेक बांगलादेशी घुसखोरांना मुसलमानांचे लांगूलचालन करणारे राजकीय पक्ष आणि काही भ्रष्ट सरकारी नोकर यांच्या हस्तक्षेपामुळे ही कागदपत्रे मिळवता आली. या कागदपत्रांच्या आधारे मतदान करून ते निवडणुकांच्या निकालांवर प्रभाव पाडू शकतात आणि भारतीय नागरिकांसाठी चालू केलेल्या कल्याणकारी योजनांचाही लाभ घेऊ शकतात.

सप्टेंबर मासात उल्हासनगर येथे अटक करण्यात आलेली बन्ना शेख या नावाची तरुणी तर चक्क रिया उर्फ आरोही अरविंद बर्डे हे हिंदु नाव धारण करून अश्लील चित्रपटांमध्ये काम करत होती. बन्ना शेख हिची आई रुबी शेख हिने अंजली असे हिंदु नाव धारण करून तिने अमरावती येथील अरविंद बर्डे नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे आणि सध्या ती अन् तिचा पती कतार येथे असतात. बन्ना शेख हिचा भाऊ रियाझ शेख याने रविंद्र असे, तर बहीण मोनी हिने रितू असे नाव धरण केले असून ते फरार आहेत. रिया हिच्याकडे भारतीय पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहेत. त्यांच्यावर तिच्या जन्माच्या वेळचा पत्ता म्हणून बंगालमधील उत्तर २४ परगणा, हुगळी आणि अचलपूर असे ३ वेगवेगळे पत्ते नमूद केले आहेत.

३. बांगलादेशी घुसखोर वापरत असलेल्या ॲपवर भारत सरकारकडून बंदी !

आतंकवादाखेरीज शस्त्रे, गुरे आणि माणसे यांची तस्करी, वेश्याव्यवसाय, संघटित गुन्हेगारी अन् दरोडे, बलात्कार, चोरी यांसारख्या गुन्ह्यांत बांगलादेशी घुसखोरांचा लक्षणीय सहभाग असल्याचे निरीक्षण महाराष्ट्रासह विविध राज्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी वेळोवेळी नोंदवलेले आहे. पकडलेल्या जवळपास सर्व बांगलादेशी घुसखोरांकडून ‘इन माय ओपिनियन’ (आय.एम्.ओ.) या ‘चॅटिंग’ (संदेशवहनाची प्रणाली) आणि ‘इंटरनेट’द्वारे संभाषण करण्यासाठी निर्मिलेल्या ‘ॲप’चा वापर केला जात होता’, असे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भारत सरकारने या ॲपवर बंदी घातली आहे.

४. बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमींना निवडून देणे ही काळाची आवश्यकता !

बांगलादेशी नागरिकांच्या महाराष्ट्रातील या घुसखोरीच्या विरोधात भाजप सातत्याने आवाज उठवत आला आहे. वर्ष १९९५ मध्ये युती सत्तेत निवडून आल्यावर बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात व्यापक मोहीम उघडण्यात आली होती. त्यानंतरच्या शासनकाळात ही मोहीम बंद पडली. बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या आणि त्यांच्या कारवाया लक्षात घेता या घुसखोरांना हाताशी धरून आतंकवाद वाढवणे अन् अराजक  पसरवणे यांचे कारस्थान रचले जात आहे का ?, अशी शंका उत्पन्न होते. ही परिस्थिती अधिक स्फोटक होण्यापासून रोखण्यासाठी आपण सजग राहून प्रखर राष्ट्रप्रेमाने प्रेरित आणि जनतेचे हित अन् सुरक्षा यांसाठी कटीबद्ध असलेल्यांना सर्वत्र सत्तारूढ करणे अत्यावश्यक आहे. आज आपण यामध्ये हयगय केली, तर येणार्‍या काळात हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकेल, हे मतदान करतांना लक्षात ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे.

(साभार : ‘न्यूज भारती, मराठी’चे संकेतस्थळ)