चांगले संस्कार जितक्या लवकर होतील तितके लाभदायक ठरतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरच श्रीमद्भगवद्गीतेची भेट झाली पाहिजे. तरुणपण जसजसे ओसरत जाते, तसतसे सुधारण्याची शक्यताही उणावत जाते. ज्याला लढायचे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे, दीर्घकालाचे भावी जीवन सुखस्वाथ्याने संपन्न करायचे आहे, त्यांच्यासाठी गीता आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती