काणकोण, १ नोव्हेंबर (वार्ता.) – काणकोण नगरपालिकेने समुद्रकिनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोहीम आरंभली आहे. या अंतर्गत पालिकेने पाटणे समुद्रकिनार्यावरील खासगी भूमीतील सुमारे ५२ अनधिकृत बांधकामे पाडली.
वर्ष २०२२ मध्ये याविषयी आलेल्या तक्रारीच्या आधारावर पालिकेने ही कारवाई केली आहे. ५२ अनधिकृत बांधकामांमध्ये ४० खोल्या आणि १२ गोदाम यांचा समावेश आहे. अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी २ दिवसांचा कालावधी लागला आणि ‘अर्थमूव्हर’च्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. पाडण्यात आलेली अनधिकृत बांधकामे कोट्यवधी रुपयांची होती आणि ती आगामी पर्यटन हंगामासाठी बांधण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पाळोळे समुद्रकिनार्यावर सदैव गर्दी असल्याने विशेषत: विदेशी पर्यटक पाटणे समुद्रकिनार्यावर जाणे पसंत करतात. पाटणे समुद्रकिनारा हा पांढरी वाळू, निळे पाणी आणि नैसर्गिक सौंदर्य यांसाठी प्रसिद्ध आहे.
संपादकीय भूमिकायापुढे काणकोण नगरपालिकेने कुणाच्या तक्रारीची वाट न पहाता अनधिकृत बांधकाम चालू होताच ते रोखावे; म्हणजे बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च वाचेल ! |