उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रीसात्त्विक हा या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१५ मध्ये ‘कु. श्रीसात्त्विक उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.१०.२०२४) |
५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा शिवमोग्गा (कर्नाटक) येथील कु. श्रीसात्त्विक (वय १२ वर्षे) याचा उद्या कार्तिक शुक्ल द्वितीया (३.११.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. श्रीसात्त्विक याला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. नम्रता
‘आमच्या घरी कुणीही आले, तरी कु. श्रीसात्त्विक त्यांना तत्परतेने नमस्कार करतो. तो त्यांच्याशी नम्रतेने वागतो.
२. प्रेमभाव
तो साधकांच्या मुलांशी जुळवून घेतो आणि त्यांच्याशी खेळतो. तो त्यांना स्वतःचा खाऊ देतो.
३. व्यष्टी साधना
तो भावपूर्ण नामजप करतो, तसेच तो प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तो रामरक्षा आणि हनुमानचालीसा न चुकता म्हणतो. तो सत्संगात आनंदाने सहभागी होतो.
४. सेवेची आवड
तो आईला सेवेत साहाय्य करतो. त्याला सेवेची आवड आहे.
५. चुकांविषयी संवेदनशीलता
एका प्रसंगात तो खोटे बोलला होता. त्याला त्याची जाणीव करून दिल्यावर त्याला पुष्कळ दुःख झाले. त्याने त्या चुकीसाठी क्षमायाचना करून प्रायश्चित्त घेतले. तो चुका लगेच स्वीकारून सुधारणा करतो, तसेच अन्य कुणाकडून चूक झाल्यास तो त्यांना निर्भयतेने सांगतो.
६. धर्माचरणाच्या कृती
तो प्रतिदिन टिळा लावतो. एखादे वेळी मी त्याला सांगायला विसरले, तरी आठवणीने तो टिळा लावतो. तो आरती आणि नमस्कार योग्य पद्धतीने करतो.
७. गुरूंप्रती भाव
एकदा त्याची प्रकृती बरी नसतांना मला काळजी वाटत होती. त्या वेळी तो ‘गुरुदेव आहेत, ते सर्व बघून घेतील’, असे सांगत होता. त्याला आपत्काळाविषयी सांगितल्यावर ‘गुरुदेवच बघतील’, असे तो सांगतो. त्याला मानसपूजा करतांना साक्षात गुरुदेव दिसल्याची अनुभूती आली आहे.’
– सौ. बनशंकरी (आई), अशोक नगर, शिवमोग्गा, कर्नाटक. (२४.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |