संतांनी वापरलेल्‍या विविध वस्‍तूंमधील चैतन्‍यामुळे सेवेतील आनंद अनुभवणारे बांदिवडे (गोवा) येथील श्री. गुरुदत्त सखदेव ! 

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात मी संतांनी वापरलेल्‍या वस्‍तूंचे जतन करणे, या सेवेशी संबंधित सेवा करतो. संंतांच्‍या वस्‍तूंमध्‍ये चैतन्‍य असल्‍याने विविध ठिकाणाहून संतांनी वापरलेल्‍या वस्‍तू रामनाथी आश्रमात जतन करून ठेवतात. ही सेवा करतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

श्री. गुरुदत्त सखदेव

अ. ‘मला संतांनी वापरलेल्‍या वस्‍तू जवळून पहायला मिळतात.

आ. ‘मी सेवा करत असतांना माझा नामजप आपोआप चालू होतो’, असे मला जाणवते.

इ. मी संतांनी वापरलेल्‍या वस्‍तू जतन करण्‍यासाठी खोक्‍यात ठेवतांना त्‍यावर क्रमांक घालून ठेवतो. या सेवा करतांना त्‍या वस्‍तूंमधून मला मोठ्या प्रमाणात चैतन्‍य मिळते.

ई. मला संतांच्‍या वस्‍तू जतन करण्‍याच्‍या सेवेतून पुष्‍कळ आनंद मिळतो आणि हलकेपणा जाणवतो.

उ. ‘गुरुदेवच (परात्‍पर गुरु डॉ. आठवलेच) माझ्‍याकडून ही सेवा करवून घेतात’, असा माझा भाव असतो.

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले, ‘आपल्‍याच कृपेमुळे संतांनी वापरलेल्‍या विविध वस्‍तूंमधील चैतन्‍य मला अनुभवता येते’, त्‍याबद्दल मी आपल्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. गुरुदत्त सखदेव, बांदिवडे, गोवा. (२९.८.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक