आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासापेक्षा संतांच्या आश्रमात राहून साधना शिकणे महत्त्वाचे असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वेदांपासून आतापर्यंत आपल्याकडे अनेक ऋषीमुनींनी अध्यात्मावर सहस्रो ग्रंथ लिहिले आहेत. ‘त्यांचा अभ्यास करून अनेक अभ्यासक ऋषीमुनी झाले’, असा इतिहास नाही. याउलट ‘अनेक ऋषीमुनींचे अनेक अद्वितीय शिष्य ऋषीमुनी झाले’, असा इतिहास आहे. यावरून ‘अध्यात्म कृतीत आणण्यात ग्रंथांपेक्षा ऋषीमुनी श्रेष्ठ आहेत’, हे लक्षात येते. असे असल्यामुळे आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास अधिक होत नाही. त्यामुळे ग्रंथांतील अद्वितीय ज्ञान अभ्यासकांपर्यंत पोचत नाही. ते अद्वितीय ज्ञान अभ्यासकांपर्यंत पोचावे, या दृष्टीने अध्यात्मातील विविध ग्रंथांतील ज्ञान सनातनच्या विविध ग्रंथांत घेतले जात आहे. त्यामुळे सनातनच्या अभ्यासू साधकांचा आणि इतर अभ्यासकांचा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास होण्यास साहाय्य होईल. तसेच त्यांची आध्यात्मिक प्रगतीही जलद गतीने होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले