पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
अखंड हरिनाम ज्याचे मुखात ।
त्याची चिंता वाहे तो भगवंत ।। १ ।।
त्याचा योगक्षेम भगवंता हाती ।
त्याला लाभेल भगवंताची संगती ।। २ ।।
भगवंत भक्त हा भेद संपेल।
भक्त भगवंतमय होईल ।। ३ ।।
असे निस्सीम भगवंताचे भक्त ।
ईश्वर इच्छेनं अवतरती संत ।। ४ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)