मुंबई – उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेकडून वरळी मतदारसंघात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वरळी येथील निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.