‘हिंदु जागरण वेदिके’कडून आंदोलन !
पुत्तूरू (कर्नाटक) – बिल्लव या मागासवर्गीय हिंदु जातीतील मुलींविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान करणार्या वनसंरक्षण अधिकारी संजीव पुजारी कन्नूर यांच्याविरुद्ध सध्या वातावरण पुष्कळ तापले आहे. ‘हिंदु जागरण वेदिके’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी भजन करून पुत्तूरू येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या समोर नुकतेच आंदोलन केले.
पुजारी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. अटक होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार हिंदूंनी व्यक्त केला. पुजारी यांच्याविरुद्ध बेल्लारे पोलिसांनी आधीच गुन्हा नोंदवला आहे; मात्र त्यांच्याविरुद्ध किरकोळ कलमे लावल्याचा हिंदु संघटनांचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पांजा उपक्षेत्राचे वन अधिकारी संजीव पुजारी कन्नूर यांनी मागासवर्गीय हिंदु मुली भजनात भाग घेत असल्यावरून त्यांच्यावर टीका केली, तसेच १ लाख मागासवर्गीय मुली वेश्या बनल्या आहेत, असेही धादांत खोटे आणि संतापजनक वक्तव्य केले. त्यानंतर मंगळुरूतील काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा कुलाय यांनी ‘मागासवर्गीय मुलींना भजनाच्या वेळी रस्त्यावर नाचवले जाते. आम्हाला भजनात उच्च जातीतील लोक दिसत नाहीत. आमच्या मागासवर्गीय मुलीच मिरवणुकीत नाचतात’, असे हिंदुद्वेष्टे वक्तव्य केले होते. (हिंदूंमध्ये जातीच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न करू पहाणार्या काँग्रेसच्या नेत्यांना हिंदूंनी वैध मार्गाने खडसावले पाहिजे ! – संपादक)