Srikrushana Janmbhumi Allahabad HC : अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली !

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित १८ प्रकरणे एकत्र न करण्याची मुसलमान पक्षाने केली होती मागणी !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – जानेवारी २०२४ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह यांच्याशी संबंधित १८ प्रकरणे एकत्रित करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध मुसलमान पक्षाने याचिका केली होती. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. २३ ऑक्टोबरला याचा निकाल देतांना न्यायालयाने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळून लावली.

श्रीकृष्णजन्मभूमी

११ जानेवारी २०२४ च्या आदेशात उच्च न्यायालयाने हिंदु पक्षाने प्रविष्ट (दाखल) केलेल्या खटल्याशी संबंधित सर्व खटले एकत्र केले होते. मुसलमान पक्षाच्या वतीने अधिवक्ता तस्नीम अहमदी यांनी खटले एकत्र करण्याचा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. तथापि हिंदु पक्षाकडून अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन म्हणाले की, मालमत्ता, तसेच प्रतिवादी समान असल्याने न्यायालयाला प्रकरणे एकत्रित करण्याचा अधिकार आहे.