येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ६ राष्ट्रीय, तर ५ राज्यस्तरीय राजकीय पक्ष !

मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेल्या पक्षांमध्ये आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, भाजप, मार्क्ससिस्ट, काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी हे राष्ट्रीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले मनसे, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे राज्यस्तरीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हाही पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या सूचीत होता.