सर्व क्रियांमध्ये भगवंत पहाणे, म्हणजे ‘क्रियायोग’ होय. ‘सर्व क्रिया भगवंताच्याच आहेत’, असा दृढनिश्चय झाला म्हणजे ‘क्रियायोग’ साधला. भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो. – प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)