१ . साधकांकडून नामजपादी उपासना करून घेणे आणि त्यांना स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वत्रच्या साधकांना साधनेचा योग्य मार्ग दाखवला आणि त्यांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांनी सर्वत्रच्या साधकांना धर्मशिक्षण दिले. त्यांनी साधकांकडून साधना, म्हणजेच नामजपादी उपासना करून घेतली आणि साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व पटवून देऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला.
२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्याने व्यक्तींच्या वृत्तीत पालट होणे
बर्याच वेळा आपण कीर्तन, प्रवचन आणि पुराण यांमधून नामाचे महत्त्व ऐकतो. त्यानुसार कृती केल्यावर मनुष्याच्या वृत्तीमध्ये पालट होतो. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणार्या बर्याच साधकांमध्ये साधनेमुळे पालट झालेले आहेत.
२ अ. सनातन संस्थेचा सत्संग ऐकल्यामुळे एका महिलेने आत्महत्येचा विचार रहित करून साधनेला प्रारंभ करणे आणि ती स्थिर अन् आनंदी असणे : एका गावातील महिलेचे पती ती साधनेत येण्यापूर्वी काही कारण नसतांना घरातून निघून गेले. ते परत आलेच नाहीत. ‘ते परत येतील’, या आशेने ती महिला सासरी रहात होती. नंतर तिने निर्णय घेतला, ‘असे जीवन जगण्यापेक्षा हा देहच नको.’ या निर्णयानंतर तिला सनातन संस्थेच्या सत्संगाविषयी एक फलक दिसला. तिने तो फलक वाचला आणि त्याप्रमाणे ती सत्संगामध्ये उपस्थित राहिली. तिने लगेच नामस्मरण चालू केले. तिने आत्महत्येचा विचार रहित करून साधनेला प्रारंभ केला. आता ती स्थिर आणि आनंदी आहे.
२ आ. साधनेत येण्यापूर्वी व्यक्तीची विचारप्रक्रिया आणि साधनेत आल्यानंतर व्यक्तीच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया
२ आ १. ‘भूमी बळकावणार्या कुटुंबातील व्यक्तीला धडा शिकवावा’, असे वाटणे : ‘एक साधक साधनेत येण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या भाऊबंदांनी भूमी बळकावली आणि ती भूमी स्वतःच्या नावावर केली. त्यामुळे साधकाच्या कुटुंबियांना पुष्कळ हलाखीचे जीवन जगावे लागले. त्यांना दुसर्याकडे मोलमजूरी करावी लागली.
त्या साधकाची साडेचार वर्षे सरकारी नोकरी झाली होती. त्या साधकाला ‘तुमची नेमणूक ‘एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’च्या माध्यमातून झाली नसल्याने तुम्हाला सेवेतून कमी करण्यात येत आहे’, अशी नोटीस देऊन नोकरीतून कमी केले. उदरनिर्वाहासाठी काहीच साधन नसल्यामुळे त्याच्या मनात ‘भूमी बळकावणार्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना धडा शिकवावा’, असे विचार तीव्रतेने येऊ लागले.
२ आ २. सनातन संस्थेच्या सत्संगाला नियमित जाणे, नामजप करणे आणि सेवा करणे अन् त्याच्या मनातील चुकीचे विचार नष्ट होणे : त्याच कालावधीत त्या गावात सनातनचे सत्संग चालू झाले. तो नियमित सत्संगाला जाऊ लागला आणि नामजप करू लागला. त्यामुळे त्याच्या मनात येणारे चुकीचे विचार नष्ट झाले. तो सेवेला जाऊ लागला. त्याच्यामध्ये पालट होऊ लागला.
२ आ ३. तो सेवेला जाण्यापूर्वी त्याला तंबाखू खाण्याचे व्यसन होते. तो आश्रमात सेवेला जाऊ लागल्यावर त्याचे तंबाखू खाण्याचे व्यसन अवघ्या १५ दिवसांत सुटले.
३. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची अपार कृपा, त्यांनी सांगितलेली साधना आणि मार्गदर्शन’ यांमुळे सहस्रो साधकांचे जीवन वाल्याचा वाल्मीकि झाल्याप्रमाणे झाले आहे’, असे वाटणे
‘हे गुरुदेवा, जेव्हापासून आपण आमच्या जीवनात आलात, तेव्हापासून आमचे सारे दुःख हरण झाले आहे. आमची मने भावभक्तीने चमकू लागली आहेत. आपल्याच कृपेने आम्हाला साधनेचा योग्य मार्ग मिळाला आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे त्यांनी सांगितलेल्या साधनेमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहस्रो साधकांचे जीवन वाल्याचा वाल्मीकि झाल्याप्रमाणे झाले आहे.
४. प्रार्थना
‘हे गुरुदेवा, साधना करतांना माझ्यावर कितीही कठीण प्रसंग आले, संघर्ष झाले, मनाविरुद्ध घडले, तरीही तुमचा हात मला घट्ट पकडता येऊ दे. माझी तुमच्यावरील श्रद्धा दृढ होऊ दे. हे तेजोमय गुरुमाऊली, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रामचंद्र (दादा) कुंभार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२३)