संपादकीय : हिंदूंवरील हिरवे आक्रमण !

भाग्यनगर येथील नामपल्ली भागातील एका सोसायटीच्या नवरात्रोत्सव मंडपात स्थापन करण्यात आलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती खंडित करण्याचा प्रकार घडला. येथील बेगम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथे गरब्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मूर्ती खंडित करण्यात आली. मुख्य म्हणजे समाजकंटकांनी येथील ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ तोडले आहेत, जेणेकरून काही पुरावा मिळू नये. थोडक्यात समाजकंटकांनी अगदी नियोजनपूर्वक हा गुन्हा केला आहे. भाग्यनगर येथील स्थिती पहाता हे कोणत्या समाजकंटकांनी केले असू शकते ? याची हिंदूंना कल्पना आहे. त्यामुळे भाजपच्या येथील स्थानिक नेत्या माधवी लता यांनी सांगितले की, हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांचे प्रमाण पहाता आता हिंदू प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ करतील. स्थानिक हिंदूंमध्ये या घटनेविषयी संताप आहे. असाच काहीसा प्रकार बंगाल येथे घडला, तेथील एका नवरात्रोत्सव मंडपावर धर्मांधांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे अधिक संख्येत उपस्थित हिंदु महिला आणि काही पुरुष यांनी धर्मांधांना पिटाळून लावले. धर्मांधांच्या नवरात्रोत्सव मंडपांवर आक्रमणाच्या घटना, मूर्ती खंडित करण्याच्या घटना केवळ शेजारील मुसलमान बहुसंख्य असलेल्या बांगलादेशातच होतात, असे ऐकले होते, त्या आता भारतातही घडू लागल्या आहेत. भारतातील हिंदूंसाठी ही स्थिती गंभीर आहे. पाकिस्तानात तर तेथील अल्पसंख्य हिंदू सण साजरेही करण्यास घाबरतात. केवळ काही भागांत एकत्र रहाणारे हिंदूच सण साजरा करू शकतात.

धर्मांधांचा हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न !

नवरात्रोत्सव मंडपांवर समाजकंटक आणि धर्मांध यांची झालेली आक्रमणे हा हिंदूंना डिवचण्याचा, आव्हान देण्याचा आणि न्यूनपणा दाखवण्याचा प्रकार आहे. काही वर्षांपूर्वी ऐन गणेशोत्सवात मिरज येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती खंडित करून दंगल घडवली होती; मात्र तेथील हिंदू संघटित असल्यामुळे धर्मांधांना प्रत्त्युत्तर देता आले. भाग्यनगर आणि बंगाल येथील काही भागांमध्ये हिंदू अल्पसंख्य, तर मुसलमान बहुसंख्य आहेत. अशा स्थितीत हिंदूंना सण साजरे करण्यास आडकाठी आणणारे हेच लोक असतात. भाग्यनगर येथे भाजपचे आमदार राजासिंह यांच्या नेतृत्वाखाली काढली जाणारी श्रीरामनवमीची मिरवणूक मागील २-३ वर्षे काढण्यास धर्मांधांकडून आडकाठी केली जात आहे. प्रशासकीय अनुमती न देणे, अन्य अनुमती देण्यास अडवणूक करणे आदी प्रकार घडतात. लाखो हिंदू उपस्थित असणार्‍या या मिरवणुकीत खोडा घालण्याचा प्रयत्न करणे, हाच खरेतर हिंदूंच्या धर्मभावनांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हासुद्धा प्रशासकीय व्यवस्थेचा उपयोग करून हिंदूंना धर्मपालन करण्यास निर्माण केलेला अडथळा आहे. सहिष्णु आणि शांत असलेल्या हिंदु समाजाच्या संयमाची परीक्षा पहाण्याचा प्रयत्न याद्वारे धर्मांध करत आहेत. हिंदू थोडे आक्रमक झाले की, हिंदूंना दंगलखोर ठरवण्यास, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू आणि भारत यांना ‘अल्पसंख्यांकांसाठी असुरक्षित वातावरण असलेला देश’, असा प्रचार करण्यास हिंदु विरोधकांची इकोसिस्टम कार्यरत आहेच. हिंदूंविरुद्ध धर्मांध विविध प्रकारचे जिहाद करतात. काश्मीर येथेही प्रारंभी काही मंदिरांवर आक्रमणे, नंतर हिंदूंवर आक्रमणे, हिंदूंची घरे, संपत्ती यांवर आक्रमणे या मार्गाने हिंदूंमध्ये दहशत निर्माण करून त्यांना त्यांच्या भागातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेलंगाणा आणि बंगाल येथे अनुक्रमे काँग्रेस अन् तृणमूल काँग्रेस यांची सरकारे आहेत. त्यामुळे आक्रमण करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता नाहीच. हिंदूंच्या उत्सव मंडपांवर आक्रमण केल्यामुळे गुजरात येथे बुलडोझर कारवाई करून संबंधितांची घरे भुईसपाट करण्यात आली. उत्तरप्रदेश येथे बुलडोझर कारवाई करून जिहाद्यांची खोड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगल्या प्रकारे जिरवत आहेत. जेथे धर्मांध आक्रमणे करत आहेत, तेथे त्यांच्या मुळावर घाव घालणारी कारवाई होणे आवश्यक आहे.

पोलिसांकडून धडक कृती अपेक्षित !

२ दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमीच्या निमित्ताने काढलेले संचलन धर्मांधांनी ‘अल्ला हूँ अकबर….’च्या घोषणा देत अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि काही हिंदुत्वनिष्ठ यांनी धर्मांधांना आवरण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही संचलनाची फेरी तेथून मार्गस्थ होऊ शकली. येथे धर्मांधांचे धाडस पहा ! संघाचे स्वयंसेवक आणि तेही काठी घेऊन संचलन करत असूनही त्यांच्या फेरीत खोडा घालण्याचा प्रयत्न धर्मांध करू धजावतात. पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ या दोघांनाही धर्मांध जराही घाबरत नाहीत, याचे हे निर्देशक आहे. पोलिसांनी केवळ तोंडी सांगून आणि थोडे हाताने ढकलून धर्मांधांना आवरण्याचा प्रयत्न केला. याच ठिकाणी धर्मांधांची फेरी असती आणि हिंदुत्वनिष्ठ तरुण त्यांचा निषेध करत असते, तर पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर लाठीमार केला असता. धर्मांधांविषयी नरमाईची भूमिका का घेतली जात आहे ? हिंदुत्वनिष्ठांनी दबाव आणल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंद केला, असे समजते, अन्यथा पोलिसांनी धर्मांधांना मोकळेच सोडले असते. पोलिसांच्या अशा पक्षपाती भूमिकेमुळे भाजपचे आमदार श्री. नितेश राणे पोलिसांना खडसावत असतात; मात्र त्यांचे बोलणे पोलिसांना लागते, विरोधी पक्षांना लागते आणि त्यांच्यावर ‘जातीयवादी,’ ‘शांतता भंग करणारे’, असा शिक्का लावण्यात येतो. धर्मांधांना तात्काळ वठणीवर आणण्याचे आदेश पोलिसांना मिळत नाहीत कि ही त्यांची निष्क्रीयता आहे ?

अशा घटनांमुळे हिंदूंसाठी आगामी काळ कठीण आहे, हे लक्षात येत आहे. प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांनी रा.स्व. संघाच्या दसर्‍याच्या कार्यक्रमात हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या दृष्टीने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा आहे; मात्र हिंदूंवर आक्रमण झाल्यास त्या यंत्रणा साहाय्यासाठी पोचेपर्यंत हिंदूंना स्वरक्षणासाठी काहीतरी कृती करणे भाग आहे. एवढ्या मोठ्या संघटनेच्या प्रमुखांनाही प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात असतांना असे आवाहन करावे लागणे; म्हणजे हिंदूंपुढे मोठे संकट आहे, हे निश्चित ! गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणांच्या निमित्ताने एकत्र येणारे हिंदू ही हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. तिचा उपयोग हिंदुरक्षण, धर्मरक्षण यांसाठी करणे, ही काळाची आवश्यकता आहे. संघटनांचे प्रमुख, योगी आदित्यनाथ यांसारखी मोठी पदे भूषणवणारी व्यक्ती हिंदूंना एकत्र रहाण्यास सांगत आहेत, ते यासाठीच ! हिंदूंनी त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेऊन जातीय भेद, सांप्रदायिक भेद विसरून ‘हिंदु’ म्हणून एकत्र येणे अपेक्षित !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर उपाययोजना न करणे, ही त्यांची निष्क्रीयता आहे का ?