देवीउपासना शक्ती देईल !

नवरात्रोत्सव विशेष

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्रहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।

– दुर्गासप्तश्लोकी

अर्थ : सर्वस्वरूपा, सर्वेश्वरी आणि सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न दिव्यरूपा दुर्गे देवी सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण कर. हे दुर्गादेवी तुला नमस्कार असो.

सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे सात्त्विक चित्र

नवरात्रोत्सव म्हणजे देवीचे पूजन करून शक्तीची उपासना करण्याचा उत्सव ! ‘हिंदूंची शक्ती कुठे आहे ?’, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती सध्या काही ठिकाणी आहे. बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती आपण सारे पहात आहोत. अजूनही ते मुसलमानांच्या भीतीच्या छायेत आणि अत्याचार सहन करत जीवन कंठत आहेत. हिंदूंना शक्ती प्रदान करणार्‍या देवीच्या पूजनालाच तेथील धर्मांधांनी बंदी आणली. बांगलादेशातील खुलना येथे दुर्गापूजेसाठी मुसलमानांनी हिंदूंना धमकावले. ‘दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख ‘टका’ (बांगलादेशी चलन. अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्यावे लागतील’, अशी धमकी हिंदूंना देण्यात आली. पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याचीही धमकी दिली. यामुळे काही मंडळांनी दुर्गापूजा न करण्याचा निर्णय घेतला. तेथे दुर्गापूजा करण्यास तीव्र विरोध होत आहे. भारतात मात्र मुसलमानांचे सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे होतात. या ईदला तर नंदुरबार येथे मुसलमानांनीच मोठ्या प्रमाणात दगडफेक करून दंगल केली. भारतातही गणेशोत्सव, दुर्गाेत्सव यांच्या मिरवणुका दगडफेकीविना निघत नाहीत, तिथे आपण बांगलादेशातील हिंदूंना सण साजरे करता यावेत, म्हणून काय करणार ? बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीविषयी भारत ठोस भूमिका कशी घेणार ? बंगालच्या हिंदूंनी बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे, तसे संपूर्ण भारतात कधी होणार ? येथील जिहादी आक्रमणांचा सामना करून आपण सक्षम बनलो, तर आपण बांगलादेशाच्या हिंदूंच्या आधार बनू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

आज बांगलादेश जळत आहे, पाकिस्तानातही हिंदूंचे हाल होत आहेत, भारतातही थोड्या फार प्रमाणात तशीच स्थिती आहे. हिंदू संघटित नसल्यानेच त्यांच्यावर आक्रमण करण्याचे धाडस धर्मांध करतात. बांगलादेशातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन दुर्गापूजेच्या ‘जिझिया’ कराच्या विरोधात आवाज उठवला. हिंदूंनी आता स्वत:तील क्षात्रतेज जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु लढला, तर आणि तरच तो आता शेष रहाणार आहे ! देवीची उपासना केल्यास तिच सर्व जिहादींशी लढण्यास शक्ती देईल !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.