शक्तीची उपासना ९ दिवसच का ?

‘शारदीय नवरात्र आणि वासंतिक नवरात्र दोन्हीमध्ये ‘शक्ती’ची उपासना ९ दिवस केली जाते. या विशेष उपासनेचा कालावधी ९ दिवसच का ? यापेक्षा अधिक किंवा अल्प दिवस का नाही ? यासंबंधी पुढीलप्रमाणे काही तर्क किंवा युक्तीवाद मांडले जातात.

१. दुर्गादेवी ही नवविधा आहे. त्यामुळे तिच्या उपासनेसाठी ९ दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे.

२. नवरात्र संपूर्ण वर्षातील दिवसांचा ४० वा भाग आहे, म्हणजे एक वर्षाच्या ३६० दिवसांना ९ या संख्येने भागले, तर ४० भाग होतात. ४० दिवसाला एक ‘मंडल’ म्हटले जाते आणि काही जप इत्यादीही ४० दिवसांपर्यंतच केले जातात. ‘भागवत पुराणा’नुसार या ४० नवरात्रांमध्ये ४ नवरात्र देवीचे महत्त्व सांगितले आहे. त्यातील शारदीय आणि वासंतिक नवरात्राचेच महत्त्व अत्याधिक मानण्यात आले आहे. यामुळे ‘शक्ती’ची उपासना ९ दिवस करणेच योग्य आहे.

३. शक्तीचे सत्त्व, रज आणि तम असे ३ गुण आहेत. यांची तिप्पट केल्यावर ९ ही संख्या होते. ज्या प्रकारे यज्ञोपवितामध्ये (जानव्यामध्ये) ३ मोठे धागे असतात आणि या तिन्ही धाग्यातील प्रत्येक धागा ३ – ३ धाग्यांनी केलेला असतो. त्याच प्रकारे प्रकृती, योग आणि माया यांचे त्रिवृत गुणात्मक रूप नवविधाच होते. महाशक्ती दुर्गेच्या उपासनेत तिच्या संपूर्ण रूपाची उपासना करण्यासाठी नवरात्रीचे ‘९ दिवस’ निश्चित करण्यात आले आहेत.’

– श्रीमती दुर्गा चौबे, जबलपूर, मध्यप्रदेश.

(साभार : ‘सनाढ्य संगम’, वर्ष १३ अंक ३)