योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्ताचे रक्षण. या सर्वांच्या पाठीमागे आसक्तीचा त्याग महत्त्वाचा. निस्त्रैगुण्य, नित्यसत्त्वस्थ, निर्योगक्षेम तेव्हाच होता येते, जेव्हा माणूस आत्मवान बनेल. आत्मवान म्हणजे ज्याचे आत्म्यावर नियंत्रण आहे, ज्याचे बुद्धीवर नियंत्रण आहे तो !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(संदर्भ : ग्रंथ ‘स्थितप्रज्ञ योग’)