भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो, त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताविषयीही करावे. त्याच्याच नावाने जगावे, म्हणजे ‘माझा सर्व कर्ता, रक्षिता, तो एकच असून त्याच्याखेरीज  माझे या जगात दुसरे कुणीही नाही’, या भावनेने रहावे. असा जो भगवंताचा होतो, त्याचे महत्त्व भगवंत स्वत:पेक्षाही अधिक वाढवतो. ‘नामाने भगवंताची प्राप्ती होणार’, ही खात्री असावी. अशा नामालाच ‘निष्ठेचे नाम’ असे म्हणतात. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज