Maijan Raza Arrested : उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या मैजान रझा याला अटक

मैजान रझा याला अटक

बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या मैजान रझा याला पोलिसांनी अटक केली. ‘आम्ही आव्हान देतो की, आम्ही महाकुंभ होऊ देणार नाही. कितीही डोकी कापावी लागली तरी चालेल’, अशी धमकी रझा याने दिली होती. त्याने मैजान रझा नावाच्या एक्स खात्यावरून सनातन धर्म, श्रीराममंदिर आणि महाकुंभ यांवर अश्‍लील टिपण्या केल्या होत्या.

योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली होती. ‘वर्ष २०२५ हे राममंदिराचे शेवटचे वर्ष आहे’, असे त्याने म्हटले होते. हिंदू संघटनांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर रझा याला अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात सुनावणी होऊन फाशीची शिक्षा ठोठावून त्याची त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे !