मंगळुरू (कर्नाटक) – एका हिंदु युवकाने मक्केविषयी इन्स्टाग्रामवर कथित अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचे कारण देत बंट्वाळ ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली. युवकाने धार्मिक भावना भडकावण्याच्या उद्देशाने पोस्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सांगितले की, या मजकुराच्या माध्यमातून मुसलमान समाजाच्या भावनांना धक्का पोचवून समाजात धार्मिक तणाव निर्माण करणारा हा संदेश होता. त्यामुळे आम्ही स्वत:हून गुन्हा नोंदवला आहे. युवकाला अटक करून न्यायालयात उपस्थित करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकापोलीस स्वतःहून अशी कारवाई कधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्यांच्या विरोधात करतात का ? |