देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण करण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !
‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक असते. यासंदर्भातील संशोधनापैकी विशिष्ट फुले वहाण्याच्या पहिल्या प्रयोगातील चाचणीतील नोंदींचे विवेचन आपण १ सप्टेंबरच्या अंकात पहिले. आज दुसर्या चाचणीतील नोंदींचे विवेचन दिले आहे.
दुसर्या प्रयोगात ‘श्री गणेशाला तुळस किंवा दूर्वा वाहिल्यावर वातावरणातील स्पंदनांमध्ये काय पालट होतात ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी, अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पहाता येते. या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे.
१. चाचणीतील नोंदींचे विवेचन
१ आ. प्रयोग २ – श्री गणेशाच्या चित्राला पत्री वहाणे : या प्रयोगात ‘श्री गणेशाच्या चित्राला तुळस आणि दूर्वा वाहिल्यावर वातावरणातील स्पंदनांमध्ये काय पालट होतात ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी प्रथम श्री गणेशाच्या चित्राला कोणतीही पत्री न वहाता ‘पी.आय.पी.’ तंत्रज्ञानाद्वारे वातावरणाचे छायाचित्र काढण्यात आले. ही ‘मूलभूत नोंद’ होय. त्यानंतर श्री गणेशाच्या चित्राला एकेक करून तुळस आणि दूर्वा वाहिल्यावर त्यांची ‘पी.आय.पी.’ छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘तुळस आणि दूर्वा वाहिल्यानंतर त्यातून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे समजले.
१ आ १. ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील (प्रभावळीतील) नकारात्मक अन् सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण, तसेच सकारात्मक स्पंदनांपैकी काही महत्त्वाच्या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूलभूत नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.
अ. श्री गणेशाच्या चित्राला पत्री वहाण्यापूर्वी तेथील वातावरणात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ६५ टक्के होते.
आ. श्री गणेशाच्या चित्राला तुळस वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ६३ टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते घटले आहे.
इ. श्री गणेशाच्या चित्राला दूर्वा वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ८२ टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते पुष्कळ वाढले आहे.
१ आ २. निष्कर्ष : दूर्वांत गणेशतत्त्व आकृष्ट अन् प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला दूर्वा वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
यातून ‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र आहे’, हे लक्षात येते. हे समजून घेऊन कृती करूया आणि चैतन्याचा लाभ करून घेऊया.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.७.२०२४)
श्री गणेशाला शमीची आणि मंदाराची पत्रीही वहातात.१. शमीची पत्री शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रे तेजस्वी रहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंथन करून ज्या वेळी अग्नी काढतात, तो मंथा शमीवृक्षाचा असतो. २. मंदाराची पत्री रुई आणि मंदार यांत भेद आहे. रुईची फळे रंगीत असतात, तर मंदाराची फळे पांढरी असतात. औषधांत पारा हे जसे रसायन आहे, तसे मंदार हे वानस्पत्य रसायन आहे. |
श्री गणेशाला धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दूर्वा वहाणे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते, हे दर्शवणारी ‘पी.आय.पी.’ छायाचित्रे !
सूचना : ‘पी.आय.पी.’ छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते. |
श्री गणेशचतुर्थीला करण्यात येणारी पत्रपूजाएकेका प्रकारच्या पानासमवेत एकेक विशिष्ट नाव घेत पत्री श्री गणेशाच्या चरणांवर वहावी. ‘श्री गणेशाची पुढील २१ पत्री वाहून पूजा करतात – मधुमालती (मालती), माका (भृंगराज), बेल, पांढर्या दूर्वा, बदरी (बोर), धोतरा, तुळस, शमी, आघाडा, बृहती (डोरली), करवीर (कण्हेर), रुई, अर्जुनसादडा, विष्णुकांत, डाळिंब, देवदार, मरुबक (मरवा), पिंपळ, जाई, केवडा (केतकी) आणि अगस्ती (हादगा). वास्तवात श्री गणेश चतुर्थी सोडून तुळशीची पाने गणपतीला कधीही वहात नाहीत.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’) |