Hindu youth killed by Muslim mob : बांगलादेशात मुसलमान जमावाकडून पोलीस ठाण्‍यातच हिंदु युवकाची हत्‍या !

  • ईश्‍वरनिंदा केल्‍याचा आरोप

  • पोलीस आणि बांगलादेशी सैनिक यांच्‍या समोर केली हत्‍या

प्रतिकात्मक छायाचित्र

ढाका (बांगलादेश) – शहरातील सोनाडांगा परिसरात ४ सप्‍टेंबर या दिवशी सामाजिक माध्‍यमांवर महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍याच्‍या आरोपावरून हिंसक मुसलमान जमावाने हिंदु युवकाची हत्‍या केली. उत्‍सव मंडल (वय १८ वर्षे) असे हत्‍या झालेल्‍या युवकाचे नाव आहे. ही घटना पोलीस ठाण्‍याच्‍या आवारातच पोलीस आणि बांगलादेशी सेनादलाचे सैनिक यांच्‍या समोरच घडली. स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्तानुसार खुलना महानगर पोलीस उपायुक्‍त (दक्षिण) महंमद ताजुल इस्‍लाम यांनी १८ वर्षीय हिंदु युवकाच्‍या हत्‍येच्‍या घटनेला दुजोरा दिला आहे.

फेसबुकवर महंमद पैगंबर यांच्‍याविषयी मजकूर प्रसारित केल्‍याचा आरोप

सामाजिक माध्‍यमांवर महंमद पैगंबर यांची निंदा केल्‍याचा आरोप करत अनेक मुसलमान विद्यार्थी हिंदु युवकाला सोनाडांगा भागातील खुलना महानगर उपायुक्‍त (दक्षिण) ताजुल इस्‍लाम यांच्‍या कार्यालयात घेऊन गेले, तसेच मुसलमानांनी पोलीस उपायुक्‍त कार्यालयाला सुमारे ३ घंटे घेराव घातला. कथित ‘ईश्‍वरनिंदा’ केल्‍याचा आरोप करून हिंदु युवकाला शिक्षा देण्‍याची मागणी मुसलमान युवक करत होते.

पोलीस आणि सैनिक यांच्‍यासमोरच केली हत्‍या

या वेळी परिस्‍थिती नियंत्रणात ठेवण्‍यासाठी सैनिक आणि नौदलाचे पथक घटनास्‍थळी पोहोचले. त्‍यानंतर उत्‍सव मंडल याला पोलिस ठाण्‍यामध्‍ये नेण्‍यात आले, तेव्‍हा धर्मांध मुसलमान जमावाने पोलीस ठाण्‍यातच त्‍याला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत पोलीस आणि सैनिक यांच्‍या समोरच उत्‍सव मंडल याचा मृत्‍यू झाला आहे.

सैन्‍याधिकार्‍यांनी सांगितले की, ‘हिंदु युवकाला अधिकाधिक शिक्षा दिली जाईल’, असे आम्‍ही मुसलमान जमावाला सांगितले होते. असे असूनही आक्रमक जमावाने त्‍याला अमानुष मारहाण करून ठार मारले.

बांगलादेशी प्रसारमाध्‍यमांनी वृत्त दडपले

उत्‍सव मंडल याची हत्‍या झाल्‍यानंतर बांगलादेशी वृत्तसंकेतस्‍थळांनी हे वृत्त प्रसिद्ध केले; मात्र काही कालावधीनंतर तेथील प्रसारमाध्‍यमांनी हे वृत्त संकेतस्‍थळांवरून काढून टाकले. हे वृत्त दडपण्‍यामागील कारण समजले नाही. (बांगलादेशात मुसलमान हिंदूंना संपवत आहेत, हे जगासमोर येऊ नये, तेथील प्रसारमाध्‍यमे कसा प्रयत्न करत आहेत, हेच यातून दिसून येते ! – संपादक)

बांगलादेशी सैन्‍य हिंदूंना लक्ष्य करणारी राष्‍ट्रव्‍यापी मोहीम हाती घेणार असल्‍याचे आधीच आले होते समोर !

बांगलादेशातील एका हिंदुत्‍वनिष्‍ठ नेत्‍याने ३ दिवसांपूर्वीच ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला सांगितले होते की, बांगलादेशी सैन्‍य लवकरच हिंदूंना लक्ष्य करणारी एक राष्‍ट्रव्‍यापी मोहीम हाती घेणार आहे. उत्‍सव मंडल याची हत्‍या हा त्‍याचाच आरंभ आहे का ? असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे.

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख डॉ. महंमद युनूस हे हिंदूंचा द्वेष करतात, तेथील अनेक नेत्‍यांनी मदरशातून कट्टरतावादाचे शिक्षण घेतलेले आहे. तेथील न्‍याययंत्रणाही ‘जमात-ए-इस्‍लामी’ या कट्टरतावादी मुसलमान संघटनेच्‍या हाती असल्‍याने हिंदूंना न्‍यायालयांचाही कोणताच आधार नाही. उत्‍सव मंडल याच्‍या हत्‍येतून पोलीस आणि सैन्‍य हेही हिंदूंच्‍या नरसंहारास पूरक भूमिकाच निभावत आहेत. तसेच उत्‍सवच्‍या हत्‍येसंदर्भातील सर्व बातम्‍या तेथील प्रसारमाध्‍यमांनी दडपल्‍या आहेत. थोडक्‍यात तेथील लोकशाही हिंदूंचा नायनाट करण्‍यासाठीच सज्‍ज झाली आहे, असेच हिंदूंना वाटत आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात पोलीस ठाण्‍यातही सुरक्षित नसणार्‍या अल्‍पसंख्‍य हिंदूंची इतरत्र काय स्‍थिती असेल ?, याची कल्‍पनाही करवत नाही. आणखी किती हिंदूंच्‍या हत्‍या झाल्‍यानंतर भारत सरकार बांदलादेशाला धडा शिकवणार आहे ?
  • भारतातील मुसलमानांच्‍या कथित ‘मॉब लिंचिंग’वरून (जमावाने हत्‍या करण्‍यावरून) भारताला ‘अल्‍पसंख्‍यांकांसाठी सर्वांत असुरक्षित देश’ घोषित करणार्‍या आंतरराष्‍ट्रीय मनावाधिकार आयोगासारख्‍या संघटना आता बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंविषयी चकार शब्‍दही काढत नाहीत, हे लक्षात घ्‍या !
  • हिंदु युवकाला मरेपर्यंत अमानुष मारहाण केली जात असतांना बांगलादेशी पोलीस आणि सैनिक अधिकारी काय करत होते ? असे पोलीस आणि सैनिक तेथील हिंदूंचे कधीही रक्षण करणार नाहीत, हे लक्षात घ्‍या !