पुणे येथे भ्रमणभाषमधील ‘हॉटस्पॉट’ वापरण्यास नकार दिल्याने हत्या !

पुणे – जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या वासुदेव कुलकर्णी यांची हत्या हडपसर येथे १ सप्टेंबर या दिवशी झाली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले असून मयूर भोसले या तरुणाला अटक केली आहे. कुलकर्णी यांनी शतपावली करतांना या मुलांना भ्रमणभाषमधील इंटरनेट (हॉटस्पॉट) यंत्रणा वापरण्यास नकार दिला. त्यातून वाद होऊन कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली, असे मयूर भोसले याने सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. तरुण पिढीवर वेळीच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !