Jesus & Mary Pictures : कर्नाटक शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर ‘येशू ख्रिस्त’ आणि ‘मेरी’ यांची चित्रे !

चामराजनगर (कर्नाटक) – काँग्रेस सत्तेत असलेल्या कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर येशू ख्रिस्त आणि मदर मेरी (येशू ख्रिस्ताची आई) यांची चित्रे लावण्यात आल्याचे समोर आले आहे. ही प्रमाणपत्रे पदवीपूर्व महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी समोर आली. प्रमाणपत्रांच्या डाव्या बाजूस येशू, तर उजव्या बाजूस मेरी यांची चित्रे आहेत.

हीच काँग्रेस सरकारची खरी धर्मनिरपेक्षता असल्याची भाजपची टीका !

यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे नेते आर्. अशोक म्हणाले की, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणे याला सरकार ‘सांप्रदायिक’ म्हणते; परंतु शिक्षण विभागाच्या प्रमाणपत्रावर येशू ख्रिस्त आणि मेरी यांची छायाचित्रे छापणे मात्र ‘धर्मनिरपेक्षता’ आहे ! हीच काँग्रेस सरकारची खरी धर्मनिरपेक्षता आहे. काँग्रेस पक्षासाठी ‘धर्मनिरपेक्षता’ हा हिंदु धर्माचा विरोध करण्यासाठी, तसेच हिंदूंचा द्वेष करण्यासाठी असलेला एक मुखवटा आहे. हिंदुविरोधी काँग्रेस सरकारला कन्नड लोक लवकरच योग्य धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया आर्. अशोक यांनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

आता कर्नाटकमधील धर्मप्रेमी हिंदु जनतेने आपापल्या विधानसभा मतदारसंघात सहस्रोंच्या संख्येने काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराकडे जाऊन याविषयी विचारणा करायला हवी. तरच काँग्रेस वठणीवर येईल !