मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रामाणिक असतील, तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे ! – S L Bhyrappa

‘मुडा’ भूमी घोटाळ्यावरून साहित्यिक एस्.एल्. भैरप्पा यांचे विधान

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व साहित्यिक एस्.एल्. भैरप्पा

मैसुरू (कर्नाटक) – ‘मुडा’ भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची अनुमती दिल्यानंतर राज्यातील प्रसिद्ध साहित्यिक एस्.एल्. भैरप्पा यांनी ‘जर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे प्रामाणिक असतील, तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे; पण राज्यपालांचा अपमान करू नये’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. येथील गणपति सच्चिदानंद आश्रमात मेघालयचे राज्यपाल सी.एच्. विजयशंकर यांचा सत्कार करतांना त्यांनी हे विधान केले.

संपादकीय भूमिका

मुख्यमंत्री प्रमाणिक नसल्यामुळेच ते त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या आदेशावर टीका करत आहेत, असेच कुणीही म्हणेल !