२६ ऑगस्ट या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ झाली. त्या निमित्ताने..
देश-विदेशातील संपूर्ण हिंदु समाजाने २६ ऑगस्ट या दिवशी मोठ्या आनंदाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. या पृथ्वीतलावरील ज्या अनेक ठिकाणी जन्माष्टमीसह अनेक धार्मिक उत्सव आनंदात साजरे केले जात होते, त्या ठिकाणी धर्मांधांच्या अत्याचारामुळे हिंदूंचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. तेथे सनातन धर्माच्या अनुयायांच्या अभावामुळे असंख्य मंदिरे, मठ आणि तीर्थक्षेत्रे नष्ट करण्यात आली आहेत. सनातनी हिंदु समाजाचे सर्व सांस्कृतिक अन् धार्मिक उत्सव अप्रासंगिक बनले आहेत. आपण कधीच विचार केला नाही की, आपल्यासमवेतच असे का होत आहे ?
जोपर्यंत आपण इतिहासाची पाने उलटून वाचणारच नाही, तोपर्यंत आपल्याला यावर तोडगा सापडणार नाही. आपण आपल्या देवीदेवता आणि महापुरुष यांनी धर्माच्या रक्षणार्थ केलेली ओजस्वितता विसरलो आहोत. आपण धर्मांध आक्रमकांच्या अत्याचाराशी लढण्याऐवजी अजूनही तडजोडीच्या नावाखाली आत्मसमर्पण करत आलो आहोत.
श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली आहे. त्यामुळे आपल्याला आनंदित करण्यासाठी आणि भक्तीरसामध्ये डुबून जाण्यासाठी ‘श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर’, ‘गोपाळांसह लोणी चोरण्याचे खेळ’ आणि ‘गोपींसमवेत रासलीला’ इत्यादींचे देखावे भव्य स्वरूपात प्रदर्शित केले जातात; परंतु आपल्याला धर्माचे रक्षण करण्यासाठी योद्धा बनण्याचा संदेश देणार्या भगवान कृष्णाच्या सुदर्शनचक्रधारी विराट रूपाचे दर्शन घडवणारे प्रदर्शन आणि अनुकरण पहायला मिळत नाही. आज धर्मरक्षणासाठी गीतेची शिकवण आचरणात आणण्याची आणि सुदर्शनचक्र उचलण्याची आवश्यकता नाही का ? सध्या ‘धर्माे रक्षति रक्षित:’ आणि ‘सत्यमेव जयते’ यांचे सिद्धांत विसरण्याची भयंकर चूकच हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याची मनीषा असणार्या जिहादींची शक्ती बनत चालली आहे.’
– श्री. विनोदकुमार सर्वोदय, राष्ट्रवादी विचारवंत आणि लेखक, गाझियाबाद, उत्तरप्रदेश. (२६.८.२०२४)