Karnataka HC On Forced Conversion : गरीब हिंदु महिलेला आमिष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना ! – कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू (कर्नाटक) – एका निर्दोष आणि गरीब महिलेला आमिष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना आहे. अशा घटना टाळण्यासाठी न्यायालये सजग आहेत. ‘समाजातील निष्पाप आणि वंचित महिला अन् बालक यांचे रक्षण करतात’, असा संदेश समाजाला देणे आवश्यक आहे, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने हिंदु महिलेवर बलात्कार करून इस्लाम धर्म स्वीकारायला  लावल्याच्या प्रकरणी रफीक बेपारी या मुसलमानाला जामीन देण्यास नुकताच नकार दिला.

रफिक बेपारी याने आधी एका हिंदु महिलेशी जवळीक आणि नंतर तिच्याशी मैत्री केली. रफिक हिंदु महिलेला ‘नोकरी मिळवून देतो’, असे सांगत होता. यासाठी रफिकने महिलेवर त्याच्यासमवेत येण्यासाठी दबाव आणला. रफिकने महिलेचे सतत लैंगिक शोषण केले. त्यानंतर रफिकने तिला बलपूर्वक बेळगाव येथे नेले आणि एका ठिकाणी कोंडून ठेवले. महिलेने कुठेही जाऊ नये; म्हणून तेथे पहारेकरी म्हणून अन्य एका महिलेला ठेवले. पीडित हिंदु महिलेला अनेक दिवस येथे कोंडून ठेवले होते. बेळगाव येथेही अनेकवेळा या महिलेवर बलात्कार झाला. यानंतर रफिकने हिंदु महिलेला लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. काही दिवसांनी महिलेने कसा तरी येथून पळ काढला आणि सर्व घटना पतीला सांगितली. यानंतर महिलेने रफिकविरुद्ध बलात्कार आणि अवैध धर्मांतर केल्याची तक्रार केली.

संपादकीय भूमिका

उच्च न्यायालयाने धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !