१. भावसत्संगात भावप्रयोगाच्या वेळी देवीच्या रूपात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिसू लागणे
‘नवरात्रातील भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘आपण देवीचे विराट रूप अनुभवायचे आहे’, असे सांगितले. मी डोळे बंद केले. तेव्हा मला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम दिसू लागला. काही क्षणांतच मला आश्रमाच्या जागी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिसू लागल्या.
जसजसे त्या देवीच्या विराट रूपाचे वर्णन करत होत्या, तसतसे मला त्या अधिक विशाल होत असल्याचे दिसत होते. त्यांचे रूप पुष्कळ विशाल असल्याने माझ्या डोळ्यांत सामावत नव्हते.
२. मनात करत असलेल्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात ऐकू येऊ लागणे
थोड्या वेळाने मी मनातल्या मनात करत असलेल्या प्रार्थनेतील प्रत्येक शब्द मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात ऐकू येऊ लागला. प्रत्येक वेळी मला त्यांचाच आवाज ऐकू येत होता. त्या वेळी माझी भावजागृती झाली.
३. आश्रमात यज्ञाच्या वेळी आध्यात्मिक त्रास होतांना मनात करत असलेला नामजप आणि प्रार्थना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात ऐकू येणे अन् चित्रात देवीच्या जागी त्यांचे अस्तित्व जाणवणे
एके दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात देवीचा यज्ञ चालू होता. मी यज्ञस्थळी बसले होते. त्या वेळी मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला. थोड्या वेळाने माझ्या त्रासात वाढ झाली. तेव्हा मी मनातल्या मनात करत असलेला नामजप मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात ऐकू येऊ लागला. मी करत असलेली प्रार्थनाही मला त्यांच्याच आवाजात ऐकू येत होती. त्या वेळी मला देवीचे तत्त्व प्रचंड प्रमाणात कार्यरत असल्याचे जाणवत होते. देवी असुरांशी युद्ध करत असलेली चित्रे ‘प्रोजेक्टर’वर दाखवण्यात येत होती. त्या प्रत्येक चित्रात देवीच्या जागी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे अस्तित्व जाणवत होते. या वेळी माझी भावजागृती होत होती. ही स्थिती १ घंटा टिकून होती.
‘हे गुरुमाऊली, आपण ही अनुभूती दिलीत, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (९.१.२०२२)
|