पू. रमेश गडकरी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी असलेल्या एकरूपतेची आलेली अनुभूती !

पू. रमेश गडकरी

‘११.६.२०२४ या दिवशी मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) ब्रह्मोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पाहिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला माझ्या डोळ्यांसमोर सतत गुरुदेवांचे दर्शन होत होते. त्यामुळे मी भावविभोर झालो होतो. त्या स्थितीतच मी समष्टीसाठी जप करण्यासाठी बसलो. तेव्हा ‘महाशून्य’, हा नामजप करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘शून्य’ या शब्दाला ‘पूज्य’, हा प्रतिशब्द आहे, तर ‘महाशून्य’, या शब्दाला ‘परम पूज्य’, हा प्रतिशब्द आहे. याचे स्वरूप कसे आहे ? शून्य काढायचे असल्यास केवळ एक वर्तुळ काढावे लागते. त्यामध्ये कुणाचेही अस्तित्व नसते, तसेच सध्या आपल्याला परम पूज्यांचा बाह्य आकार दिसत असला, तरी आतून ती एक पूर्ण पोकळी आहे.’ त्यानंतर ‘आपण गुरुदेवांचाच एक अंश आहोत’, असे जाणवून मला माझ्या भोवतीसुद्धा एक वर्तुळ दिसले आणि त्यात काहीही नव्हते.’

– (पू.) रमेश गडकरी (सनातनचे १९ वे संत, वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक