सातखिडा (बांगलादेश) येथील घटना !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सातखिडा जिल्ह्यात ५ ऑगस्ट या दिवशी ताला पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मांध मुसलमानांनी एका हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या मानवी अधिकारांसाठी लढणार्या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी या घटनेची माहिती दिली.
Victim of a brutal gang rape, the Bangladeshi Hindu woman fears to file a Police complaint.
📍Satkhira (Bangladesh)
🛑In a separate incident Asim Das was taken out of the house and the house was set on fire; Das ran away to a distant village fearing for his life, without… pic.twitter.com/TyJdpZl5lb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 17, 2024
त्यांनी स्थानिक पोलीस अधीक्षकांना याविषयीची माहिती देऊन घटनेसंदर्भात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे का ? अशी विचारणा केली असता ‘कुणीही अशी घटना नोंदवलेली नाही’, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. वास्तविक स्थानिक दैनिक ‘कालबेला’मध्ये या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली होती. ‘बलात्कार्यांच्या भयामुळे पीडित महिलेने यासंदर्भातील माहिती पोलिसात दिली नाही’, असे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.
बांगलादेशात घडलेल्या दुसर्या एका घटनेत पटुआखाली जिल्ह्यात असीम दास यांच्या कुटुंबाला घराबाहेर काढून त्यांच्या घराला आग लावण्यात आली. ही घटना ६ ऑगस्ट या दिवशी घडली. पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी यासंदर्भात पीडित कुटुंबातील प्रीतम साहा यांना संपर्क साधला असता ते रडायला लागले आणि जिवाच्या भयापोटी दूर पळून गेल्याविषयी त्यांनी सांगितले. पू. घोष यांनी पटुआखालीच्या पोलीस अधीक्षकांना या घटनेविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे या प्रकरणी कोणतीही तक्रार प्रविष्ट करण्यात आलेली नाही. |
संपादकीय भूमिकाही आहे इस्लामी बांगलादेशातील हिंदूंची दैनावस्था ! तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर दबाव आणला पाहिजे आणि ‘भारत सरकारने हे करावे’, यासाठी हिंदूंनी त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक आमदार आणि खासदार यांना तसे करण्यासाठी भाग पाडले पाहिजे ! |