ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाचे नवे गृह सल्लागार सखावत हुसैन यांनी हिंदु समुदायाचे पुरेसे संरक्षण न केल्याबद्दल त्यांची क्षमा मागितली. ते म्हणाले की, हिंदु अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे, हे बहुसंख्य मुसलमानांचे कर्तव्य आहे.
Bangladesh’s interim Government apologises for failing to protect Hindus
Merely offering an apology is not enough; compensation should be provided to the Hindus who have suffered harm.
Those responsible for the violence should be given strict punishment.
An independent law and… pic.twitter.com/7D2nHEMJvd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 12, 2024
बांगलादेशात चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘आंदोलकांनी १९ ऑगस्टपर्यंत सर्व बेकायदेशीर शस्त्रे पोलिसांकडे जमा करावीत’, असे आवाहनही सखावत हुसैन यांनी केले आहे. जवळच्या पोलीस ठाण्यात शस्त्रे जमा न करणार्यांवर प्रशासन कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच कोणाकडे बेकायदा शस्त्रसाठा आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकानुसती क्षमायाचना करून काही होणार नाही, तर हिंदूंना हानीभरपाई दिली पाहिजे. हिंसाचार करणार्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. हिंदूच्या कायमस्वरूपी रक्षणासाठी स्वतंत्र कायदा आणि खाते बनवले पाहिजे ! |