महिलेची ४४ लाखांची फसवणूक !

नफा मिळवून देण्याचे दाखवले आमीष

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून नफा मिळून देण्याचे आमीष दाखवून ३९ वर्षीय महिलेची ४४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी ‘फेसबूक’वरून महिलेला संपर्क करून नफा मिळून देण्याच्या नावाखाली जम्बिन नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तिला आरंभी चांगला नफाही झाला. या महिलेने ५६ व्यवहाराद्वारे ४३ लाख ८७ सहस्र रुपये आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांत हस्तांतरित केले. तिला ॲप्लिकेशनमध्ये रक्कम जमा झालेली दिसली. त्यानंतर तिने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ती काढता आली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार केली. (फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क रहायला हवे – संपादक)