जोधपूर (राजस्थान) – देशविरोधी शक्ती घटनात्मक संस्थांचा त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी व्यासपीठ म्हणून वापर करत आहेत. या देशाचे तुकडे करण्यास या शक्ती सिद्ध आहेत. बांगलादेशात ज्या घटना घडल्या, त्याच भारतातही घडतील, असे षड्यंत्र देशातील काही लोकांनी रचले आहे. अशा लोकांपासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी केला. ते येथे राजस्थानच्या बार कौन्सिलच्या कार्यक्रमात बोलत होते.
काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘भारतात बांगलादेशासारखी स्थिती होऊ शकते’, या विधानावर उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, या लोकांनी आयुष्यात उच्च पदे भूषवली आहेत. ते देशाच्या संसदेचे सदस्य आणि मंत्री राहिले आहेत. त्यांच्यापैकी एकाला परराष्ट्र सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. अशा उत्तरदायी पदांवर असलेले लोक असा खोटा प्रचार कसा करू शकतात ?
संपादकीय भूमिकाअशांपासून सावध रहाण्याऐवजी अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे ! |