१. मानसिक
कथा, प्रवचने यांसारख्या माध्यमांतून केवळ वैचारिक स्तरावर अध्यात्म सांगणे आणि ग्रहण करणे, हे मानसिक स्तरावरील होते. हल्लीच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अध्यात्म शिकण्याचा हा ‘बालवाडी’चा स्तर होतो.
२. बौद्धिक
अध्यात्माचे नियम, त्यांतील बारकावे अन् त्यांचे विविध पैलू यांचा बौद्धिक स्तरावर अभ्यास करणे, हा अध्यात्म शिकण्याचा माध्यमिक स्तर होतो.
३. आध्यात्मिक
प्रायोगिक स्तरावर अध्यात्म जगणे, म्हणजेच प्रत्यक्ष साधना करणे, हा अध्यात्म शिकण्याचा महत्त्वाचा स्तर असतो. हल्लीच्या शैक्षणिक पद्धतीनुसार अध्यात्माचा हा ‘पदवीधर’ स्तरावरील अभ्यासक्रम ठरतो.
सनातन संस्था साधकांना या तीनही स्तरांनुसार साधना शिकवते. त्यामुळेच सनातनच्या साधकांची आध्यात्मिक उन्नती जलद होत आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले