मुंबई सेवाकेंद्रात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या समवेत सेवा करतांना लक्षात आलेली त्‍यांची सर्वज्ञता !

‘मी मुंबई सेवाकेंद्रात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या समवेत काही काळ सेवा केली आहे. त्‍या वेळी मी त्‍यांची सर्वज्ञता अनुभवली. त्‍यांनी सेवेतील अनेक बारकावे मला शिकवले. त्‍याविषयीचे २ प्रसंग पुढे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. कार्यपद्धतीचे पालन न केल्‍याने झालेली चूक दाखवणे 

सौ. आरती नाडकर्णी

‘एकदा मी भांडी पुसून कपाटात ठेवली होती. भांडी ठेवण्‍यापूर्वी मी ती कार्यपद्धतीप्रमाणे नीट पुसून ठेवली नव्‍हती. तेव्‍हा तेथे परात्‍पर गुरु डॉ. आठवले आले आणि त्‍यांनी कपाट उघडून नेमकी मी ठेवलेली भांडी काढून मला माझी चूक दाखवली.

२. कोमट दूध शीतकपाटात ठेवल्‍यावर त्‍याच वेळी येऊन साधिकेला त्‍याविषयी प्रश्‍न विचारणे 

एकदा मी कोमट दूध शीतकपाटात ठेवले. त्‍या वेळी अचानक परात्‍पर गुरु डॉ. आठवले स्‍वयंपाकघरात आले आणि त्‍यांनी ते दुधाचे भांडे शीतकपाटातून बाहेर काढून मला विचारले, ‘‘ तुला कोमट दूध शीतकपाटात ठेवायचे नसते, हे ठाऊक नाही का ?’’

– सौ. आरती नाडकर्णी, फोंडा, गोवा. (२२.६.२०२४)