‘अवामी लीग’ पक्षाचे समर्थक असल्याने हिंदूंवर आक्रमण ! – भारतातील मुसलमानधार्जिणे वृत्तसंकेतस्थळ ‘स्क्रोल’
न्यूयॉर्क (अमेरिका) / देहली – जिहादी कट्टरतावादी मुसलमानांनी बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात हैदोस घातला आहे. अनेक हिंदूंना ठार करण्यात आले असून शेकडो हिंदूंची घरे आणि दुकाने लुटून त्यांना आग लावण्यात आली आहे. अनेक मंदिरांना आग लावण्यात आली असून काही हिंदु महिलांवर बलात्कारही झाले आहेत. अशातच पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी हिंदुविरोधी वार्तांकन केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने ‘बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराला ‘मुसलमानांचा सूड (रिव्हेंज)’ म्हणून संबोधले आहे, तर हिंदुद्वेष्टे भारतीय वृत्तसंकेतस्थळ ‘स्क्रोल’ने हिंदूंवरील या हिंसाचाराचे खापर भारतातील हिंदूंवर फोडले आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशातील हिंसाचारावर लिहिलेल्या अग्रलेखातील ठळक सूत्रे अशी…!
१. लेखाच्या मथळ्यातच ‘बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांना ‘सूड म्हणून केलेले आक्रमण’, असे वर्णिले आहे. यातून या दैनिकाला म्हणायचे आहे की, पूर्वी हिंदूंकडून इस्लामी कट्टरतावाद्यांवर अन्याय झाला होता, ज्याचा आता सूड घेतला जात आहे.
२. आक्रमणकारी हे कट्टर इस्लामी असल्यामुळे हिंदूंवर आक्रमणे होत नसून ते शेख हसीना यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर आक्रमणे केली जात आहेत. यातून त्याला सांगायचे आहे की, हे आक्रमण धार्मिक नसून राजकीय स्वरूपाचे आहे.
बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचारासाठी ‘स्क्रोल डॉट इन’ने भारतातील हिंदूंना धरले उत्तरदायी
‘स्क्रोल’ने म्हटले की,
१. सत्ता यशस्वीपणे उलथवून टाकल्यानंतरही हुकूमशाही अवामी लीग सरकारच्या विरोधातील राग हिंसक घटनांच्या रूपात व्यक्त होत आहे. प्रत्येक सत्ता उलथून टाकल्यानंतर हिंसा घडते आणि यात असामान्य असे काही नाही.
२. भारतीय प्रसारमाध्यमांचे उजवे पक्ष बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराच्या बातम्या दाखवून परिस्थिती बिघडवत आहेत. खरेतर इस्लामी कट्टरपंथी आणि ‘जमात-ए-इस्लामी’चे लोक करत असलेल्या हिंसाचाराला हिंदूही उत्तरदायी आहेत.
३. दंगलखोरांना लुटायचे असल्याने ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत.
संपादकीय भूमिका
|