जमावबंदीचा आदेश असतांना मोठ्या संख्येने मुसलमानांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिल्या घोषणा !
कोल्हापूर – १४ जुलैला विशाळगड आणि गजापूर येथे काही लोकांनी मुसलमानांचे धार्मिक स्थळ असलेले दर्गा, मशीद, तसेच मुसलमान समाजातील लोकांवर आक्रमण केले. यात मुसलमानांची घरे आणि दुकाने यांची हानी झाली. या घटनेमुळे कोल्हापूर येथे धार्मिक तणाव निर्माण झाला. याला सर्वस्वी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे उत्तरदायी असून त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, तसेच विशाळगड आणि गजापूर गावात कट रचून धार्मिक स्थळ अन् अल्पसंख्यांक मुसलमान लोकांवर आक्रमण करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘एम्.आय.एम्.’च्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
१. जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश असतांनाही १९ जुलैला मुसलमान समाजातील लोकांनी एकत्र येऊन ‘ला इलाहा इलल्ला’(अल्लाच्या व्यतिरिक्त दुसरा कुणी भगवंत नाही) , ‘अल्ला हू अकबर’(अल्ला महान आहे) , अशा घोषणा दिल्या !
२. एकीकडे १८ जुलैला पोलिसांनी आवाहन केल्यावर सकल हिंदु समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर होणारी आरती रहित केली. याउलट मुसलमान समाजाने मात्र मोठ्या संख्येने एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले. (यावरून या देशात कायद्याचे पालन कोण करते आणि कायदा कोण मोडतो ?, ते स्पष्ट होते ! – संपादक)
३. विशाळगडावरील अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा पाठिंबा नाही, असे निवेदनात म्हटले आहे. (असे आहे, तर ही अतिक्रमणे हटवण्यासाठी ‘एम्.आय.एम्.’चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आजपर्यंत काय केले ? किती निवेदने दिली ? किती वेळा आंदोलन केले हेही सांगायला हवे ! तसेच आजपर्यंत जे पशूबळी आणि अन्य अयोग्य गोष्टी होत होत्या ते थांबवण्यासाठीही कधी आंदोलन केल्याचे ऐकीवात नाही ! – संपादक)
४. ‘हल्लेखोरांनी केलेल्या आक्रमणात घायाळ झालेल्यांना ५ लाख रुपयांचे साहाय्य द्या, मुसलमान समाजासाठी संरक्षण कायदा तात्काळ संमत करावा’, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. (राज्यात अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी मुसलमान समाजाने हिंदूंच्या शोभायात्रांवर आक्रमण केले आहे, विविध कुरापती काढून हिंदु समाजावर-त्यांच्या घरांवर आक्रमणे केली आहेत. त्यामुळे राज्यात मुसलमान नाही, तर हिंदूंवर आक्रमण करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|