पुणे – कर्वे रस्त्यावरील बंगल्यातील खिडकीचे गज वाकवून घरातील १३ लाख ८४ सहस्र रुपयांचे सोने आणि हिरे यांचे दागिने चोरून नेले होते. ही घटना नुकतीच उघडकीस आली. गुन्हे शाखेच्या ‘विभाग १’च्या पथकाने अन्वेषण करत अल्लाबक्ष पीरजादे या सराईत गुन्हेगाराला केवळ ४८ घंट्यांमध्ये अटक केली आहे. (अशा धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई न केल्यामुळे ते पुढील गुन्हे करण्यास मोकळे होतात. पोलीस हे का लक्षात घेत नाहीत ? – संपादक) त्याच्याकडून १७ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ८४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रिवष्ट केली होती.