न्यूयॉर्क – भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेत ‘इंडिया डे परेड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये होणार्या या कार्यक्रमात लोकांना श्रीराममंदिराचा देखावा पहायला मिळणार आहे. या उत्सवात अमेरिकेतील सहस्रो भारतीय नागरिक सहभागी होणार आहेत.
India Day parade in New York to feature Ayodhya Ram Mandir tableau
The annual parade which attracts thousands of Indian Americans from in and around New York, highlights India’s rich cultural heritage, traditions and accomplishments.@FIANYNJCTNEpic.twitter.com/DTweOgNbp1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 11, 2024
‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन’ने (‘एफ्.आय.ए.’ने) सांगितले की, ‘इंडिया डे परेड’च्या कार्यक्रमात प्रसिद्ध भारतीय अभिनेते पंकज त्रिपाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताबाहेर आयोजित करण्यात येणारा हा सर्वांत मोठा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमाद्वारे न्यूयॉर्कमध्ये भारताच्या महान संस्कृतीविषयी विविध माध्यमांतून माहिती दिली जाणार आहे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आधारित आहे, असे ‘एफ्.आय.ए.’चे अध्यक्ष डॉ. अविनाश गुप्ता यांनी सांगितले.