|
मुंबई – प्रभादेवी भागातील दैनिक ‘सामना’च्या कार्यालयाच्या समोर हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे उघड झाले आहे. प्रभादेवीतील कामगारनगर भागात सोमवार, बुधवार आणि शुक्रवार येथे हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी ख्रिस्त्यांकडून प्रवचन घेतले जात असल्याचा आरोप भाजपच्या माहीम विधानसभेच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी केला आहे. ‘जीवन ज्योती प्रार्थना सत्संग केंद्र’ असे हिंदु नाव असलेल्या ठिकाणी हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा तेंडुलकर यांनी आरोप केला आहे. दादरसारख्या हिंदूबहुल भागात असे प्रकार होत आहेत. यासंदर्भातील तक्रार आणि रितसर पत्र पोलिसांना देण्यात आले आहेत. हे केंद्र चालवत असलेले प्रफुल आगरे यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याद्वारे तक्रारही प्रविष्ट करण्यात येणार आहे. (बाटगे ख्रिस्ती आधीचे हिंदु नाव तसेच ठेवतात; कारण त्यांना हिंदु समाजामध्ये वावरून हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते, हेच यातून दिसून येते ! – संपादक)
Attempt to convert Hindus to Christianity in Mumbai’s Prabhadevi through allurement
Complaint to be lodged against the individuals running the center
BJP’s Akshata Tendulkar (@OfficialAkshata) inspects the center
The reason attempts to convert Hindus to Christianity in Hindu… pic.twitter.com/ZVecqHjDua
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2024
१. अक्षता तेंडुलकर यांच्याकडे काही तक्रारी आल्यानंतर त्या थेट केंद्रात गेल्या. तेथे प्रफुल आगरे प्रवचन देत होते. या वेळी ते सांगत होते, ‘तू सच्चा परमेश्वर है । तू सबकुछ जानता है । हालेलुया हालेलुया हालेलुयाह ।’ ‘हालेलुयाह’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाची स्तुती करा.’ तो हिब्रू शब्द आहे. यानंतर बसलेले सर्व हिंदू ‘हालेलुयाह’ हा शब्द उच्चारू लागले. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच ते अशा प्रकारचे ख्रिस्ती शब्द उच्चारतात ! – संपादक)
२. अक्षता तेंडुलकर यांनी प्रवचनकाराला विचारले, ‘हे लोक ख्रिस्ती आहेत कि हिंदू ?’ यावर ते म्हणाले, ‘‘हिंदू. मीसुद्धा हिंदु आहे.’’ मग तेंडुलकर म्हणाल्या, ‘‘तुम्ही हिंदु असतांना अशी प्रवचने का घेता ? हिंदूंचे देव नाहीत का ?’’ त्यानंतर अक्षता तेंडुलकर आणि तेथे जमलेल्या स्त्रियांनी प्रवचनकारांसमवेत वाद घातला.
३. स्थानिकांचे म्हणणे आहे की, प्रभादेवी येथे बेकायदेशीर धर्मांतर केंद्र चालू आहे. तेथे हिंदूंच्या देवतांविषयी नकारात्मक बोलून हिंदूंचे मन वळवले जाते. हे केंद्र आतील बाजूला असल्याने अशा प्रकारे अपलाभ घेतला जातो. या केंद्रात ९९ टक्के हिंदु असतात. त्यात महिलांचा समावेश अधिख होता. या केंद्रात कॅमेरे लावलेले आहेत. या केंद्राला मिशनरी निधी देतात. तो निधी विदेशातून येतो. (याचाही शोध घेऊन निधी पुरवणार्यांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) येथे काळी जादू आणि संमोहनही केले जाते, असा आरोप आहे.
४. या केंद्रात एका महिलेला मूत्राशयाचा त्रास होता. त्यावर प्रफुल आगरे यांनी सांगितले होते, ‘तुम्ही आधुनिक वैद्यांकडे न जाता प्रार्थनेला या. आमचा परमेश्वर तुम्हाला बरे करेल.’ (अंनिसवाले अशा वेळी कुठे असतात ? – संपादक) प्रत्यक्षात त्या महिलेचे नंतर निधन झाले.
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल भागात हिंदूंच्या ख्रिस्ती धर्मांतराचा प्रयत्न होणे याला हिंदू संघटित नसणे हेच कारण आहे ! धर्मप्रेमी हिंदूंनी हे केंद्र बंद पाडण्यासाठी वैध मागाने प्रयत्न करायला हवेत ! |