पुणे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक पोलीस ठार, दुसरा गंभीर घायाळ !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ७ जुलैच्या मध्यरात्री बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने २ पोलिसांना उडवले. या घटनेत एका पोलीस कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर घायाळ झाला आहे. समाधान कोळी असे मृत पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे, तर पी.सी. शिंदे असे गंभीर घायाळ झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला असून सध्या पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. (वाहनचालकांकडून अपघात घडवून पळून जाण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याविषयी कठोर कारवाई आणि योग्य उपाययोजना केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)