कोल्हापूर : श्री जोतिबा देवस्थान तथा श्री केदारलिंग देवस्थान मूर्तीची पहाणी पुरातत्व विभागाने केली होती. पहाणी केल्यावर मूर्ती सुस्थितीत रहाण्यासाठी मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया करावी लागेल, असा अहवाल साहाय्यक संचालक, पुणे यांनी दिला होता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याला मान्यता दिली असून पुरातत्व विभागाच्या वतीने जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रसिद्धीपत्रक –
त्यामुळे श्री जोतिबा देवाच्या मूळ मूर्तीचे भाविकांना दर्शन घेता येणार नसून या कालावधीत भाविकांना उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कळवले आहे.