उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ चे प्रकरण उजेडात !
देवबंद (उत्तरप्रदेश) – येथील एका मुसलमान डॉक्टरने त्याचा धर्म लपवून हिंदु महिलेशी लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा पीडित महिलेला त्याच्याविषयी खरी माहिती मिळाली तेव्हा डॉक्टरने बलपूर्वक तिचा धर्म पालटला आणि नंतर इस्लामी प्रथेप्रमाणे तिच्याशी निकाह केला. पीडित महिला ही बंगालची रहिवासी आहे. तिच्या म्हणण्यानुसार, देवबंदच्या मुसलमान डॉक्टर अबर याने त्याचे अमन दीक्षित असे नाव सांगून हिंदु प्रथेप्रमाणे तिच्याशी लग्न केले होते. यानंतर आरोपीने तिला देवबंदमध्ये आणून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले आणि तिच्याशी निकाह केला. पीडित हिंदु महिलेचा आरोप आहे की, डॉ. अबर याने आतापर्यंत ५ विवाह केले आहेत.
Mu$|!m Doctor pretends to be Hindu, marries Hindu woman, forcefully converts her when exposed – Love Ji#ad in Deoband, UP
No matter how well-educated and high ranking a Mu$|!m is, Ji#ad remains their top priority, as seen from these incidents.
No Government can stop Love J!h@d,… pic.twitter.com/mLsNVHvigd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2024
पीडित हिंदु महिलेने हिंदु संघटनांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांसमोर या घटनेचे कथन केले. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉ. अबर याच्याविरुद्ध देवबंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तक्रारीत बलात्कार आणि मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकार्याने सांगितले.
संपादकीय भूमिका
|