छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नारायणगाव (पुणे) येथे विविध संघटनांचे रस्ता बंद आंदोलन !

नारायणगाव (जिल्हा पुणे), ३० जून (वार्ता.) – हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ २८ जूनला सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई बुचके (भाजप)
विश्व हिंदु परिषद पुणे जिल्हा सत्संग प्रमुख श्री. प्रतीक चिखले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतांना ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आणि निवृत्त मेजर श्री. उमेश अवचट

या वेळी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ब्राह्मण संघ, माझी सैनिक संघटना आदी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलनस्थळी करण्यात आली. या वेळी भाजपच्या पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई बुचके, विश्व हिंदु परिषद पुणे जिल्हा सत्संग प्रमुख श्री. प्रतीक चिखले, बजरंग दलाचे श्री. नामदेव खैरे आदींनी मनोगत व्यक्त केले.