Spitting jihad : नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान दुकानदाराने उसाच्या रसात मिसळली थुंकी !

  • उत्तरप्रदेशमध्ये ‘थुंकी जिहाद !’

  • हिंदु जोडप्याने निषेध करताच त्यांच्याशी असभ्य वर्तन !

आरोपी साहेब आलम आणि जमशेद खान

नोएडा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा येथील सेक्टर १२१मधील ‘क्लियो काउंटी सोसायटी’जवळ उसाचा रस विकणार्‍या एका मुसलमान दुकानदाराने उसाच्या रसात थुंकी मिसळून एका हिंदु जोडप्याला तो प्यायला दिला. याचा हिंदु जोडप्याने निषेध केला असता मुसलमान दुकानदार आणि त्याचा एक मुसलमान कर्मचारी यांनी हिंदु जोडप्याशी गैरवर्तन केले. यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी साहेब आलम आणि जमशेद खान यांना अटक केली.

सेक्टर १२१मधील ‘क्लियो काउंटी सोसायटी’मध्ये रहाणारे क्षितिज भाटिया हे शनिवारी सायंकाळी पत्नीसह सोसायटीच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर उसाचा रस पिण्यासाठी आरोपींच्या दुकानात गेले होते. त्यांनी दोन ग्लास उसाचा रस मागवला. उसाचा रस बनवतांना दुकानदार ग्लासमध्ये तीन ते चार वेळा थुंकल्याचे त्यांनी पाहिले. दुकानदाराच्या या कृतीचा भाटिया जोडप्याने निषेध केला. त्यावर दुकानदार आणि त्याचा सहकारी यांनी त्यांना शिवीगाळ चालू केली. लोकांचा जमाव पाहून दोन्ही आरोपी दुकान सोडून पळून गेले.

भाटिया जोडप्याने या घटनेच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. ही घटना आपला धर्म आणि प्रकृती यांच्या दृष्टीने अयोग्य असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

आता अशांच्या दुकानांवर जनतेचे बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !