सांगली येथे ‘हिंदु एकता आंदोलन संघटने’द्वारे १८ जूनला निदर्शने !

वटवृक्षाची विटंबना करणारे ‘मॉडर्न ६५ चिकन’ विक्रीचे खोके हटवण्‍यासाठी

नळभाग आणि खणभाग येथे वटवृक्षाच्‍या शेजारी ‘मॉडर्न ६५ चिकन’ची खोकी

सांगली, १६ जून (वार्ता.) – शहरातील नळभाग आणि खणभाग येथील हिंदु धर्मातील आदराचे स्‍थान असणार्‍या वटवृक्षाची विटंबना करणारे ‘मॉडर्न ६५ चिकन’ विक्रीचे खोके (स्‍टॉल) हटवण्‍यासाठी १८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता हिंदु एकता आंदोलन संघटनेद्वारे निदर्शने करण्‍यात येणार आहेत, अशी माहिती हिंदु एकता आंदोलनाचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष संजय जाधव यांनी दिली. (हिंदूंना निदर्शने का करावी लागतात ? पोलिसांचे काम काय ? – संपादक)

१. प्रतिवर्षी वटपौर्णिमेला नळभाग आणि खणभाग येथील हिंदु माता भगिनी ज्‍या वटवृक्षाची पूजा करत होत्‍या, त्‍या वटवृक्षाचा कठडा फोडून ‘मॉडर्न ६५ चिकन’चे खोके उभे केले आहे. त्‍या खोक्‍यातून चिकनची सर्रासपणे विक्री केली जात आहे.

२. खोकेधारकांनी खोक्‍याचा क्रमांक नसतांना अनधिकृतपणे भले मोठे खोके बसवले आहे. या खोक्‍याच्‍या शेजारी असलेल्‍या हिंदु दुकानदार आणि या भागातील आसपासच्‍या हिंदूंनी सदर ‘मॉडर्न ६५ चिकन’ विक्रीला विरोध केला, तर धर्मांध मुसलमान खोकीधारक हिंदूंना धमकावून त्‍यांच्‍यावर शस्‍त्राद्वारे आक्रमण करण्‍याचा प्रयत्न करतात. (अशा उद्दाम धर्मांधांविरूद्ध हिंदूंनी संघटित होऊन मागण्‍या मान्‍य होईपर्यंत आंदोलन करणे आवश्‍यक ! – संपादक)

३. यापूर्वी एका हिंदु दुकानदारास धर्मांध मुसलमानांनी मारहाणही केली आहे. या कारणास्‍तव हे खोके वटपौर्णिमेच्‍या अगोदर हटवण्‍यात यावे. हिंदु माता-भगिनी पूर्वीपासून या वडाच्‍या झाडाची पूजा करत आहेत.

४. हिंदु महिलांना सदर वडाच्‍या झाडाला फेरी मारून वटपौर्णिमा साजरी करण्‍यासाठी लवकरात लवकर ‘मॉडर्न ६५ चिकन’चे खोके काढावे. या अनधिकृत खोक्‍या संदर्भात आयुक्‍तांना निवेदन देण्‍यात आले असून त्‍यावर अद्याप कारवाई झालेली नाही.

५. कोणत्‍याही परिस्‍थितीत ‘हिंदु एकता आंदोलन’ हे खोके हटवल्‍याविना स्‍वस्‍थ बसणार नाही. तरी सदर अनधिकृत खोके काढण्‍यासाठी या भागातील हिंदु महिला आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी मोठ्या संख्‍येने आंदोलनाच्‍या ठिकाणी उपस्‍थित रहावे, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

संपादकीय भूमिका :

  • हिंदूंच्‍या धार्मिक ठिकाणीच धर्मांधांनी अवमानकारक कृती करणे, हा त्‍यांचा हिंदुद्वेषच आहे !
  • विरोध केल्‍यावर धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमणाचा प्रयत्न करतात !