Muslims Threw Cows Head In  Jagannath Temple : रतलाम (मध्यप्रदेश) येथील जगन्नाथ मंदिरात धर्मांध मुसलमानांनी फेकले गायीचे छिन्नविछिन्न मुंडके !

रतलाम (मध्यप्रदेश) – येथील जावरा भागातील भगवान जगन्नाथ मंदिरात १४ जूनच्या रात्री दोन धर्मांध मुसलमान तरुणांनी गायीचे छिन्नविछिन्न झालेले मुंडके फेकले आणि तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. आंदोलक हिंदूंनी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. स्थानिकांचा रोष पाहून पोलिसांनी झाकीर आणि शाकीर नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. (यातून हिंदूंवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला, तरच पोलीस कारवाई करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

येथील जगन्नाथ महादेव मंदिराचे पुजारी सकाळीच मंदिरात पोचले असता त्यांना गायीच्या वासराचे रक्ताने माखलेले मुंडके दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस आणि स्थानिक लोकांना याची माहिती दिली. याची माहिती मिळताच स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाविक तातडीने मंदिरात पोचले. यानंतर लोकांनी जावरा मार्केट बंद करून आंदोलन केले. आंदोलकांनी जावरा पोलीस ठाणे गाठून आरोपींवर गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही केली.

पोलिसांनी आरोपींना त्यांच्या घरून कह्यात घेतले.

पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासून दोन्ही आरोपींची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी झाकीर आणि शाकीर या दोघांना त्यांच्या घरून कह्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक राकेश खाखा यांनी सांगितले की, आरोपींनी बेकायदेशीरपणे बांधलेली घरे जिल्हा प्रशासनाच्या साहाय्याने बुलडोझरने पाडण्यात आली आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेष नसानसांत भिनलेले धर्मांध मुसलमान ! अशांच्या विरोधात अशी  कारवाई झाली पाहिजे, ज्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यास कुणी विचारही करणार नाही !