पत्नीच्या जाचाला कंटाळून मुंबईत पोलिसाची आत्महत्या !

मुंबई – पत्नीच्या जाचाला कंटाळून शीव पोलीस वसाहतीमधील प्रतीक्षानगर येथे रहाणारे पोलीस शिपाई विजय साळुंखे (वय ३८ वर्षे) यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे हे कारण नमूद केले आहे. १४ जूनच्या रात्री ही घटना घडली. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.