पुणे येथे कापडी फलकावरील टिपू सुलतानचे चित्र फाडल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

पुणे – पुणे जिल्हाधिकारी कार्यालय चौक आणि बोल्हाईमाता मंदिर, सोमवार पेठ येथे उत्तरप्रदेशमध्ये खासदार झालेले आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शुभेच्छा देणारा कापडी फलक पक्षाचे पदाधिकारी अधिवक्ता तौसिफ शेख यांनी लावला होता. या कापडी फलकावर विविध महापुरुषांच्या चित्रासमवेत टिपू सुलतानचेही चित्र लावण्यात आले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत ते चित्र फाडले. त्यामुळे या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वाती गायकवाड यांनी तक्रार दिली आहे.

संपादकीय भूमिका :

  • ‘चोराच्या उलट्या…’ या म्हणीप्रमाणे झाले. या फलकामुळे शहरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे फलक लावणार्‍यांवरच कारवाई करायला हवी !
  • टिपू सुलतान हा अन्यायकारी आणि हिंदूंवर अत्याचार करणारा प्रशासक होता. क्रूरकर्मा टिपू सुलतानचे चित्र कापडी फलकावर लावणे म्हणजे त्याचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे. असे पक्ष भारताचे शत्रूच होत !